Case registered 
बीड

Beed Crime | दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष विनायक लोंढे यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल

महावितरणच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ व धमकी देवून केले होते रस्ता रोको आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

केज :- थकीत बिला पोटी घरातील विद्युत पुरवठा खंडित केला म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ व धमकी देवून रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या दलित महासंघाच्या तालुकाध्यक्षा विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. ७ मार्च रोजी केज येथील दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष विनायक लोंढे यांच्या घराचे विद्युत बिल थकीत असल्या कारणाने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे विनायक लोंढे व त्यांची पत्नी यांनी दि. ८ मार्च रोजी केज येथील उपविभागीय कार्यालयात जाऊन तेथील कर्मचारी श्रीमती मुंडे आणि उपअभियंता यांना शिवीगाळ केली. तसेच दि. १० मार्च रोजी त्यांनी अनाधिकृतरीत्या रस्ता रोको केला आणि वरिष्ठ तंत्रज्ञ विकास शिंदे यांना फोन वरून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी अनधिकृतरीत्या रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहतूक खोळंबून संपुर्ण महावितरण कंपनीचे केज येथील काम थांबले. तसेच त्यांनी महावितरणच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आणि शासकीय कामात अटकाव केला.

या प्रकरणी कनिष्ठ अभियंता शीतल सय्यद यांच्या फियादी वरून दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष विनायक लोंढे यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे आणि धमकी दिल्या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा नं. १६२ /२०२५ भा. न्या. सं. २२१, ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरण आणि पोलिसांत संघर्ष

विनायक लोंढे यांनी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली म्हणून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास पोलिस विलंब करीत असल्याच्या संशयावरून कनिष्ठ अभियंता श्रीमती शीतल सय्यद आणि त्यांचे कर्मचारी यांनी केज पोलिस ठाण्यात ठिय्या देऊन काम बंद आंदोलन केले होते. त्या नंतर रात्री सुमारे ८:०० वा. च्या सुमारास लोंढे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT