केज (बीड) - उदगीरकडून केज मार्गे जालन्याकडे जात असलेल्या ट्रकमधील तूर आणि सोयाबीनचे कट्टे केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात चोरट्यांनी चोरले आहेत. त्याची एकूण किंमत ७८ हजार रु. आहे. मध्यप्रदेश राज्यातील मनसुवर जिल्ह्यात जगदिश हजरीलाल नारावत (रा. पांगा, ता. भानपुरा) हा राजस्थान राज्यातील जालावाड जिल्ह्यातील राजू बंजारा यांच्या मालीच्या टेम्पो क्र. (आर जे१७/जी ए ८५४०) वर ड्रायव्हर म्हणून काम करीत आहे.
दि.१९ जुलै रोजी जगदीश नारावत राजस्थान राज्यातील कोटा येथील ट्रान्सपोर्ट कंपनीमधून तणनाशक व सोयाबीन फवारणीचे औषध घेऊन उदगीर येथे प्रकाश राजाराम मुंदडा (रा. उदगीर, जि. लातुर) यांचे जगदीश कृषी सेवा केंद्र या दुकानात माल पोहोचवला. त्या नंतर त्या दुकानदाराने जगदीश नारावत याला सोयाबीनचे १२९ कट्टे व तुरीचे २३ कट्टे पंधरा किलो तूर घेऊन जालना येथे घेऊन जाण्यास सांगितले. तो ट्रकमधून हा माल केज मार्गे जालन्याकडे घेऊन जात असताना दि. २४ जुलै रोजी ४:३० वाजण्याच्या सुमारास केज येथील पेट्रोल पंपावरुन डिझेल टाकले. त्यानंतर मालाची पाहणी करुन तो मांजरसुंबा येथे ५:३० वा. आला.
चहा पिण्यासाठी उतरले तेव्हा गाडीमध्ये पाहिले असता त्यामध्ये भरलेल्या मालात ५ कट्टे तूर व एक कट्टा सोयाबीन आणि पंधरा किलो तुरीचे कट्टे दिसून आले नाहीत. ट्रक ड्रायव्हर जगदीश नारावत याने आजूबाजूला शोध घेतला. परंतु माल दिसला नाही.
चालक जगदीश नारावत याने दि. २५ जुलै रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गु. र. नं. ४१३/२०२४ भा. न्या.सं. ३०३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार दत्तात्रय बिक्कड हे तपास करीत आहेत.