Beed connection of Mahadev betting app.. Big action of Beed police
महादेव बेटिंग ॲपचे बीड कनेक्शन.. बीड पोलिसांची मोठी कारवाई.. Pudhari Photo
बीड

महादेव बेटिंग ॲपचे बीड कनेक्शन.. पोलिसांची मोठी कारवाई..

पुढारी वृत्तसेवा

बीड : पुढारी वृत्तसेवा :

देशभर गाजणाऱ्या महादेव अॅप प्रकरणाचे आता बीड कनेक्शन समोर आले आहे. या अॅपवर बीडमधून चालवल्या जाणाऱ्या सट्टयावर सायबर पोलिसांनी छापा टाकला. या वेळी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून विविध बँकांचे १५० एटीएम कार्ड, ६७ बँक पासबुक, १०० चेकबुक आणि २५ सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात आणखी चार ते पाच जणांचा सहभाग असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. मात्र हे रॅकेट मोठे असल्याचे प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

महादेव बेटिंग अॅप प्रकरण देशभर गाजत आहे. या ॲपद्वारे बीड शहरातून सट्टा चालवला जात असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती. शहरातील जालना रोडवरील एका अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये छापा टाकला. या वेळी रूपेश गंगाधर साखरे (रा. टेंभुर्णी, घाटशीळ पारगाव, ता. शिरूर) ही व्यक्ती महादेव ॲपवर ऑनलाईन सट्टा चालवत असल्याचे समोर आले. त्याला अटक केली गेली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

संशयिताकडून संबंधित बँक खात्याचे चेकबुक, एटीएम कार्ड हे आरोपींनी स्वतःकडे जमा करून घेत ऑनलाईन बँकिेग सोबत दुसरेच मोबाईल नंबर लिंक करून त्याचा गैरवापर केला. दरम्यान, या प्रकरणी व्याप्ती आता बीडपर्यंत आल्याचे पहायला मिळत आहे. एका खात्यातून दुसरीकडे पैसे ट्रान्सफर रूपेश साखरे हा ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या ग्राहकांकडून फोन पे, गुगल पे, नेट बँकिंगद्वारे पैसे घेत होता. हे पैसे तो विविध बँक खात्यात ट्रान्सफर करत होता. त्यासाठी त्याच्याकडे १५० एटीएम, ६७ पासबुक, १०० चेकबुक, २५ सिमकार्ड आढळून आले.

SCROLL FOR NEXT