केज :- केज तालुक्यातील एका सरपंचाने मनरेगाच्या वैक्तिक लाभाच्या विहिर मंजूर करण्यासाठी पैसे घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडला आहे.
केज तालुक्यातील तरनळी येथील सरपंच महादेव खेडकर याने त्यांचे सहकारी आणि उपसरपंच शिवाजी मोहिते यांच्याकडून त्यांच्या मनरेगा योजनेच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेतील विहीर मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी केली.
परंतु शिवाजी मोहिते यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी धाराशिव येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्या नंतर दि. १३ जानेवारी रोजी लाचलुचपत विभागाने सापळा रचून सरपंच महादेव खेडकर हे उपसरपंच शिवाजी मोहिते यांच्याकडून लाच घेत असताना रंगेहाथ पकडण्यात आला. या प्रकारणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.