Beed Bindusara River Road Expansion pudhari photo
बीड

Beed Bindusara River Road Expansion : बिंदुसरा नदीचा काठ विस्तारणार; वाहतुकीला मिळणार पर्यायी मार्ग!

संत सावता महाराज मंदिर ते ब्रह्मवृंद गोविंदपंत समाधीपर्यंत रस्ता स्वच्छ; कचरा जेसीबीने हटवला

पुढारी वृत्तसेवा

बीड : बीड शहरातील बिंदुसरा नदीलगतच्या रस्त्याचा विस्तार आणि स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आहे. संत सावता महाराज मंदिर ते संत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा ब्रह्मवृंद गोविंदपंत यांच्या समाधीपर्यंतचा दक्षिण-उत्तर मार्ग मोकळा करण्यासाठी नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने पुढाकार घेतला आहे. या मार्गाचा विस्तार झाल्यास संत मुक्ताई मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन शहराला पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. तसेच हा मार्ग थेट मोंढा रोडला जोडला जाणार असल्याने जड वाहनांच्या वाहतुकीसाठीही सोयीचा ठरणार आहे, अशी माहिती स्वच्छता सभापती शेख निजाम यांनी दिली.

आमदार विजयसिंह पंडित, नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे, मुख्याधिकारी मांडुरके आणि स्वच्छता विभागप्रमुख भागवत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहेत. सभापती, नगरसेवक आणि विधानसभा समन्वयक शेख मुजीब यांच्या सहकार्याने हे काम पुढे जात असल्याचे शेख निजाम यांनी सांगितले. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयप्रमुख भागवत तावरे उपस्थित होते.

बिंदुसरा नदीलगतचा हा मार्ग विकसित झाल्यास शहरातील वाहतुकीला नवा पर्याय उपलब्ध होईल. विशेषतः संत मुक्ताई मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. मोंढा रोडशी थेट जोडणी झाल्यानंतर जड वाहनांनाही या मार्गाचा वापर करता येईल. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने या रस्त्याचा विस्तार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नदीकाठचा परिसर स्वच्छ करून रस्ता रुंद करण्याच्या कामाला प्राधान्य दिले जात असल्याचेही शेख निजाम यांनी स्पष्ट केले.

सभापती शेख निजाम यांचा पुढाकार

बिंदुसरा नदीपात्राची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून डम्पिंग ग्राउंडसारखी झाली होती. नदीकाठावर आणि पात्रात मोठ्या प्रमाणावर घनकचरा साचला होता. तब्बल दहा वर्षांपासून साचलेल्या या कचर्‍याला पहिल्यांदाच जेसीबीच्या साहाय्याने हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. स्वच्छता सभापती शेख निजाम यांनी जेसीबीच्या ताफ्यासह नदीपात्रात उतरून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. त्यामुळे नदीपात्रातील कचरा हटण्यासोबतच रस्ता रुंद करण्याचा मार्गही मोकळा होत असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT