Beed: Assets worth Rs 3 crore found with corrupt executive engineer
बीड : लाचखोर कार्यकारी अभियंत्‍याकडे आढळली ३ कोटी रूपयांची मालमत्‍ता  Pudhari File Photo
बीड

बीड : कार्यकारी अभियंत्‍याकडे आढळली ३ कोटी रूपयांची बेहिशेबी मालमत्ता

पुढारी वृत्तसेवा

बीड : पुढारी वृत्‍तसेवा

अंबाजोगाई येथे 2022 मध्ये कार्यरत असलेले बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे (सध्या कार्यकारी अभियंता विकास विभाग क्रमांक चार अंधेरी मुंबई) यांना 22 फेब्रुवारी 2022 रोजी लाच घेताना पकडण्यात आले होते. या प्रकरणात अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंद करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या मालमत्तेच्या उघड चौकशीचे आदेश देखील प्राप्त झाले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोकणे यांच्या मालमत्तेची चौकशी केली असता त्यांनी कायदेशीर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा 238% अधिक रकमेची अपसंपदा संपादित केली असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या पत्नी व स्वतःच्या नावे 3 कोटी 2 लाख 64 हजार रुपयांची मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आता या प्रकरणात कोकणे यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ ज्योती कोकणे यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक युनुस शेख हे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

SCROLL FOR NEXT