Crime News Pudhari
बीड

Beed Crime | कारचा पाठलाग करून चाकू हल्ला: एक गंभीर जखमी; मोबाईलसह रोख रक्कम लुटली

आष्टी तालुक्यातील हनुमंतगाव फाट्याजवळ भरदिवसा कारचा पाठलाग

पुढारी वृत्तसेवा

Ashti Taluka Car Chase Knife Attack

कडा : आष्टी तालुक्यातील हनुमंतगाव फाट्याजवळ भरदिवसा कारचा पाठलाग करून चाकूने हल्ला व मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून आरोपींनी रोख रक्कम व मोबाईल लुटून नेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शौकत ताहेर कुरेशी व त्यांचे सहकारी गुलाम हसन शेख (दोघे रा. खडकत, ता. आष्टी, जि. बीड) हे एमएच-१२ जेझेड-२३३० क्रमांकाच्या कारने जामखेडकडे बाजारासाठी जात होते. त्यावेळी मनोज फुलारी (रा. शिरगाव, ता. जि. अहमदनगर) व सागर भांबरे हे पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनातून त्यांच्या गाडीचा पाठलाग करत असल्याचे समोर आले.

हनुमंतगाव फाट्याजवळ पोहोचताच आरोपींनी बोलेरो वाहनाने कुरेशी यांच्या कारला मागून धडक दिली. त्यानंतर बोलेरोमधून उतरलेल्या चार ते पाच जणांनी कारची डिक्की उघडण्याचा प्रयत्न केला. याबाबत विचारणा केली असता मनोज फुलारी याने फिर्यादींच्या मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला करत डोक्यात वार केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला.

या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT