Ashti flood victim
आष्टी: तालुक्यातील शिंदेवाडी येथील शनिवारी (दि.२०) भाग्यश्री गोपाळ खंडागळे (वय ४५) या शेतातून घरी परतत असताना माळेवाडी नदीच्या पुरात वाहून गेल्याने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना आ. सुरेश धस यांच्या हस्ते ४ लाखांचा आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
या घटनेबाबत आ. सुरेश धस यांनी तहसीलदार वैशाली पाटील यांना तातडीने या कुटुंबाला आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मदत देण्याच्या सूचना दिल्या होत्या. खंडागळे कुटुंबियांना नैसर्गिक आपत्तीची तातडीची शासकीय मदत म्हणून ४ लाख रुपयांचा धनादेश आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्याचे आ. सुरेश धस हस्ते देण्यात आला.
यावेळी तहसीलदार वैशाली पाटील, नायब तहसीलदार मोहिते, ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब बनगे, सचिन काकडे, सचिन पवार व संतोष खंडागळे हे उपस्थित होते. संकट काळी मदतीचा हात मिळाल्याने खंडागळे कुटुंबांनी आमदार धस व तहसिलदार वैशाली पाटील यांचे आभार मानले.