Kalvati lake missing retired official
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील काळवटी साठवण तलावात गुरुवारी (दि. १८) सकाळी पोहण्यासाठी गेलेले अंबाजोगाई पंचायत समिती येथील सेवा निवृत्त कर्मचारी विश्वनाथ बुरांडे यांचा शोध लागलेला नाही. पाण्यात पोहण्यासाठी गेलेले बुरांडे बराच काळ बाहेर न आल्याचे तेथील नागरिकास निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ त्यांच्या कुटुंबियांस तसेच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर तात्काळ अंबाजोगाई येथील बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परळी येथील शोध व बचाव पथकास देखील पाचारण केले. गुरुवार , शुक्रवार येथील पथकाने बचाव व शोध मोहीम राबवली त्यामध्ये त्यांना यश आले नाही.
त्यामुळे मालवण येथील शोध व बचाव पथक येऊन ते देखील शनिवार (दि. २०) दिवसभर बुरांडे यांचा शोध घेत होते. मात्र, संध्याकाळ पर्यंत त्यांना देखील बुरांडे यांचा शोध लागला नाही . त्यामुळे विश्वनाथ बुरांडे यांच्या कुटुंबियात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिक अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तर्क वितर्क लावत असल्याने तीन दिवसांपूर्वी पोहण्यासाठी गेलेले विश्वनाथ बुरांडे यांच्या विषयाची चर्चा सर्वत्र होताना दिसून येत आहे.