Ira Kodarkar Silver Medal  Pudhari
बीड

Ambajogai News | खोलेश्वरच्या इरा कोदरकरची डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत चमक; सिल्व्हर मेडल पटकावले

Ira Kodarkar Silver Medal | DRDO चे वैज्ञानिक अशोक नगरकर, मधुबाला चिंचाळकर यांच्या हस्ते इरा सन्मानित

पुढारी वृत्तसेवा

Dr. Homi Bhabha Bal Vaidyanik Spardha winner

अंबाजोगाई : येथील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कु. इरा किरण कोदरकर हिने डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत उल्लेखनीय यश संपादन करत सिल्व्हर मेडल मिळवले आहे.

मुंबईतील यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे आयोजित भव्य समारंभात DRDO चे वैज्ञानिक अशोक नगरकर आणि मधुबाला चिंचाळकर यांच्या हस्ते इराला सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील तब्बल १,०३,५८४ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत सहभाग घेतला होता. त्यातून ८,०४० विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी, तर अंतिम फेरीसाठी ८२० विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या अंतिम फेरीत इराने उत्कृष्ट कामगिरी करत दुसरा क्रमांक मिळवला.

स्पर्धेच्या अंतिम टप्प्यासाठी इराने ‘वाढती वाहतूक कोंडी आणि तिचे पर्यावरण व सजीवांवरील दुष्परिणाम’ हा विषय निवडला होता. या विषयावर तिने अंबाजोगाई शहरात प्रत्यक्ष पाहणी करत, तज्ज्ञ व्यक्तींच्या मुलाखती घेऊन सखोल अभ्यासपूर्ण प्रकल्प सादर केला.

या यशासाठी इराला तिच्या पालकांचे, शाळेच्या मुख्याध्यापकांचे तसेच विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

इराच्या या यशाबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, मुख्य प्रशासकीय समन्वयक प्रा. चंद्रकांत मुळे, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल देशपांडे, कार्यवाह किरण कोदरकर, तसेच शाळेचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले, उपमुख्याध्यापक संदीप देशमुख, पर्यवेक्षक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT