चिमुरडीवर अत्याचार Pudhari File Photo
बीड

बीड : अंगणवाडीतील साडेपाच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

पुढारी वृत्तसेवा

माजलगाव : राज्यात शाळेत शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलींवर अत्याचाराच्या घटनांची मालिका सुरूच असून बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका शाळेतील अंगणवाडीत साडेपाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका अज्ञाताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

राज्यात बदलापूरच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून त्यानंतर दररोज कोठे ना कोठे शाळकरी मुलींवर अत्याचाराच्या, अन्यायाच्या घटना घडत असल्याच्या उघड होत आहेत. त्यामुळे पालक वर्गात अगोदरच भीतीचे वातावरण पसरलेले आहे. बीडमधील माजलगाव शहरात एका शाळेतील अंगणवाडीत याच परिसरातील एक साडेपाच वर्षीय चिमुरडी शिकते. या चिमुरडीवर याच शाळेतील एका अज्ञात इसमाने २७ सप्टेंबर रोजी अत्याचार केला होता. घटनेनंतर चिमुरडी ताप येऊन आजारी पडली. त्यामुळे तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. घरी आल्यावर तिने शाळेत घडलेली ही गोष्ट आपल्या पालकांना सांगितली. पांढरे कपडे घातलेला माणसाला मी ओळखते, असेही ती चिमुरडीने सांगितले.

या घटनेनंतर चिमुरडीच्या पालकांनी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गुरूवारी (दि.३) तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरुद्ध लैंगिक अत्याचार पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस यंत्रणा उपविभागीय अधिकारी धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सूर्यातळ व त्यांचे सहकारी तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT