प्रेम प्रकरणातून चोर ठरविले; बदनामीमुळे तरुणाने जीवन संपविले file photo
बीड

प्रेम प्रकरणातून चोर ठरविले; बदनामीमुळे तरुणाने जीवन संपविले

बीडमधील धक्कादायक प्रकार; झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख, चौघांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Beed A thief was convicted of a love affair; Young Man Ends His Life Due to Defamation

बीड, पुढारी वृत्तसेवा: प्रेम प्रकरणाच्या रागातून एका २३ वर्षीय तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण करणे आणि त्यानंतर त्याला मचोरफ म्हणून बदनाम करणे, या मानसिक छळाला कंटाळून तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ज्ञानेश्वर कोकाटे (२३, रा. मांजरसुंबा) असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वरचे शेजारच्या गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. याची कुणकुण लागताच तरुणीच्या नातेवाइकांनी ज्ञानेश् बरला गाठले. त्याला संबंधित गावात बोलावून त्याची दुचाकी आणि मोबाईल काढून घेतला. त्यानंतर चार जणांनी त्याला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्याला मचोरफ ठरवून सर्वत्र त्याची बदनामी केली. या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे खचलेल्या ज्ञानेश्वरने धुळे-सोलापूर महामार्गावरील एका टायर पंक्चरच्या दुकानात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.

पोलिस प्रशासन काय म्हणते ?

मृताच्या सुसाईड नोट आणि नातेवाइकांच्या तक्रारीवरून नेकनूर पोलिस ठाण्यात चार आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुराव्यांचे संकलन सुरू असून, या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. -एस. व्ही. गोसावी, पोलिस अधिकारी, नेकनूर

सुसाईड नोटमध्ये अन्यायाचा पाढा

आत्महत्येपूर्वी ज्ञानेश्वरने लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्यावर झालेल्या अन्यायाची व्यथा मांडली आहे. मला खूप मारले, गावात चोरटा म्हणून बदनाम केले. तुला जिवे मारून टाकू, अशा धमक्या देण्यात आल्या, असे त्याने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. या चिडीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, नातेवाइकांनी संताप व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT