जन्मदात्यांचा गळा घोटून मुलांनी संपवले जीवन

आत्महत्येचा संशय फोल; शवविच्छेदनातून खुलासा
Crime News
Crime News : मस्साजोगमधील युवतीने रहिमतपूरमध्ये जीवन संपवलेPudhari Photo
Published on
Updated on

The children ended their lives by strangling their parents

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : मुदखेड तालुक्यातील जवळा (मुऱ्हार) येथील एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूच्या घटनेचा धक्कादायक उलगडा झाला आहे. हे प्रकरण सामूहिक आत्महत्येचे नसून, आर्थिक विवंचनेतून पोटच्या मुलांनीच आधी आई-वडिलांचा गळा दाबून खून केला आणि नंतर स्वतः रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

Crime News
भाजपाच्या उमेदवार यादीवर अशोक चव्हाण यांचा वरचष्मा !

या प्रकरणी मयत रमेश लखे यांचे बंधू व्यंकटी होनाजी लखे यांच्या फिर्यादीवरून बारड पोलिस ठाण्यात मयत मुले उमेश आणि बजरंग यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या गुरुवारी सकाळी रमेश होनाजी लखे (वय 51) आणि त्यांची पत्नी राधाबाई (वय 44) यांचे मृतदेह घरात, तर त्यांची मुले उमेश (वय 25) आणि बजरंग (वय 22) यांचे मृतदेह मुगट रेल्वे रुळावर आढळून आले होते. सुरुवातीला रमेश आणि राधाबाई यांनी गळफास घेतल्याची चर्चा होती. मात्र, पोलिसांना घटनास्थळी आणि शवविच्छेदनात वेगळेच सत्य सापडले. पती-पत्नीचे मृतदेह वेगवेगळ्या पलंगावर होते आणि त्यांच्या गळ्यावर दाब दिल्याच्या खुणा होत्या. शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.

Crime News
Agriculture transformer: महावितरणचा आडमुठेपणा! दोन महिन्यांपासून ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त; सलगरा खुर्दमध्ये रब्बी पिके कोमेजली

त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, मुलांनीच हे कृत्य केल्याचे समोर आले. पोलिसांनी मयत मुलांवर गुन्हा दाखल करून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली असली, तरी या खटल्यात आरोपी हयात नाहीत. याबाबत कायदेतज्ज्ञ ॲड. शिरीष नागापूरकर यांनी सांगितले की, गुन्हा उघड झाला असला तरी दोन्ही मुख्य आरोपींचा मृत्यू झाला आहे. भारतीय कायद्यानुसार मृत व्यक्तीवर खटला चालवता येत नाही किंवा त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करता येत नाही. त्यामुळे हे प्रकरण कायदेशीरदृष्ट्‌‍या अबेट होऊन नस्तीबंद केले जाईल.

असा घडला घटनाक्रम

लखे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यातच रमेश यांचे आजारपण असल्याने औषधोपचाराचा खर्च आणि संसाराचा गाडा हाकताना मुलांची ओढाताण होत होती. या परिस्थितीला कंटाळून उमेश आणि बजरंग या दोघांनी बुधवारी मध्यरात्री आई-वडिलांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून मुगट रेल्वेस्थानकावर गेले. तेथे गाडी पार्क करून त्यांनी धावत्या रेल्वेखाली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news