Santosh Deshmukh Murder Case : कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा, अन्यथा कठोर निर्णय घेणार : धनंजय देशमुख  File Photo
बीड

Santosh Deshmukh Murder Case : कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा, अन्यथा कठोर निर्णय घेणार : धनंजय देशमुख

आरोपींच्या समर्थकाकडून देशमुख कुटुंबावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्‍याचे देशमुख म्‍हणाले.

पुढारी वृत्तसेवा

Arrest Krishna Andhale immediately: Dhananjay Deshmukh

केज, पुढारी वृत्तसेवा : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाला सहा महिने उलटून गेले. मात्र अद्याप या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. त्याला तत्काळ अटक करा. त्याच्या पासून कुटुंबीयांच्या जीवितास धोका आहे. त्याला अटक न केल्यास धनंजय देशमुख लवकरच कठोर निर्णय घेणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी त्यांची भूमिका जाहीर केले आहे.

संतोष देखमुख हत्येचा खटला बीड येथील न्यायालयात सुरू आहे. सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या परिसरात आरोपींचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी हे पक्ष चिन्ह असलेल्या गाड्या मोठ्या संख्येने आणून वातावरण भयभीत करून देशमुख कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

या विषयी देशमुख कुटुंबीयांनी आणि अनेकांनी वेळोवेळी मागणी करून देखील हत्याकांडातील सर्व आरोपी यांना एकाच जेलमध्ये ठेवले आहे. त्यांना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्याची असं न झाल्यास मी कठोर निर्णय घेणार असून त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेनंतर वाल्मिक कराडसह इतर आरोपी मकोका अंतर्गत अटकेत आहेत. या प्रकरणाला सहा महिने पूर्ण झाले असून अजूनही कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे.

काय म्हणाले धनंजय देशमुख?

फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करा. ही आमची वारंवार मागणी आहे. जेल प्रशासनातील मागील काही दिवसांपासून दिली जाणारी व्हीआयपी ट्रीटमेंट बघता आरोपींना वेगवेगळ्या कारागृहात हलविण्यात यावे, ही आमची मागणी होती. पण तसं काहीही झालं नाही. त्यावेळेस असं सगळं असताना बीड कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या गाड्या, पदाधिकारी, आरोपींचे समर्थन करणारे लोक मोठ्या प्रमाणात हजर राहून देशमुख कुटुंबावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

भीतीयुक्त वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाकी इतर कुठल्याही प्रकरणातील आरोपी जेरबंद होतात, मात्र देशमुख कुटुंबातील कृष्णा आंधळे २०४ दिवसांपासून फरार आहे. त्याच्यापासून कुटुंबीयांच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे लवकरात लवकर कृष्णा आंधळेला अटक करण्यासाठी मी कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल. या मागणीची गंभीर दखल घ्यावी असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT