Vadgaon Dhok incident
गेवराई : गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथील शेतकरी व टाळकरी प्रल्हाद विश्वनाथ नेहरकर (वय ५५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना शनिवारी ( दि.११) सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथील रहिवासी असलेले शेतकरी, तथा टाळकरी शनिवारी पहाटे काकड आरतीला गेले होते. दरम्यान, परत घरी आल्यावर त्यांनी आपल्या घरातील हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून जीवन संपविले.
गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात गेवराई पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. ते माजी सरपंच रमेश नेहरकर यांचे चुलत भाऊ होत. या घटनेचे कारण समजू शकलेले नाही.