केज : पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले शिकारीची साहित्या आणि काळवीटचे मांस Pudhari Photo
बीड

बीड : वरपगावामध्ये काळवीटची शिकार; चार जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे : केज

केज येथील वरपगावमध्ये काळवीटाची शिकार करून त्यांचे मांस वाटप करताना चार शिकाऱ्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. यावेळी काळवीटाचे मांस, शिंगे आणि त्याचे शिर पोलिसांनी शिकाऱ्यांकडून जप्त केली आहे. अटक केलेल्या चौघांमध्ये एका अल्पवयीन संशयिताचा समावेश देखील आहे. या दरम्यान चार शिकाऱ्यांपैकी तिघांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि.२४) स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे केज उपविभागात गस्त घालत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी फोनव्दारे पोलीस उपनिरिक्षक मूरकुटे यांनी कळविले की, वरपगांव शिवारात पारधी वस्तीवर बन्सी पवार यांच्या शेडमध्ये काळवीट मारुन त्याचे वाटे करणे चालू आहे. त्या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले.

आदेश मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरपगाव येथे छापा टाकला. त्यावेळी बन्सी पवा यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये भैय्या बन्सी पवार, सुनिल ज्ञानोबा पवार, लाला शहाजी शिंदे आणि एक अल्पवयीन मुलगा हे चारजण गोलाकार बसुन काळवीटाचे मासांचे हत्याराने तुकडे वाटे करताना दिसले. त्याचे समोर एक काळवीटाचे दोन शिंगे असलेले शिर, इतर दोन काळवीटाचे शिंगे होती. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर ताब्याच घेतलेल्या संशयितांकडून शिकारीसाठी वापरलेले साहित्या, २० किलो वजनांचे काळवीटाचे मासांचे व हाडाचे तुकडे जप्त करण्यात आले. धाराशिव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरक्षक सचिन खटके, सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल मोरे, पोलीस हवालदार हुसेन सय्यद, पोलीस हवालदार प्रदीप वाघमारे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपींना बुधवार (दि.28) पोलिस कोठडी सुनावली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT