केज तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस महिलेस ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार Pudhari File Photo
बीड

Beed Crime News : केज तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस महिलेस ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार

आरोपीस कोठडी; गुंगीचे औषध देऊन अश्लील फोटो काढल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Anganwadi Helper from Kaij Taluka Repeatedly Abused After Being Blackmailed

केज, पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय अंगणवाडी मदतनीस महिलेला गुंगीचे औषध देऊन तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढत, ते व्हायरल करण्याची धमकी देत ११ महिन्यांच्या कालावधीत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी युसुफवडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील संभाजीनगर परिसरातील विकास लक्ष्मण खाडे याची पीडित महिलेशी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने महिलेला लस्सीतून गुंगीचे औषध दिले. ती बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढले. त्यानंतर हे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी देत आरोपीने मे २०२५ ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत कळंब व केज येथील विविध लॉज तसेच पीडितेच्या गावी नेऊन वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या सततच्या छळाला कंटाळून अखेर पीडित महिलेने युसुफवडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी विकास खाडे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १२२/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४ (१), ६४ (२) (म) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला कळंब येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला केज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भारत बर्डे हे करीत आहेत.

११ महिने पीडितेवर अत्याचार

विकास लक्ष्मण खाडे याची पीडित महिलेशी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने महिलेला लस्सीतून गुंगीचे औषध दिले. ती बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढले. हे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी देत आरोपीने मे २०२५ ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत कळंब व केज येथील विविध लॉज तसेच पीडितेच्या गावी नेऊन जवळपास ११ महिने पीडितेवर वारंवार अत्याचार केल्याचा खाडेवर आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT