सहा जुगाऱ्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त pudhari photo
बीड

Ambajogai gambling raid : सहा जुगाऱ्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

एकूण 4 लाख 73 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहराच्या हद्दीलगत असलेल्या अंबा सहकारी साखर कारखाना रोडवरील जान्हवी हॉटेल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अंबाजोगाई शहर पोलिसांनी गुरुवारी (दि. 2) धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी सहा जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि मोटारसायकली असा एकूण 4 लाख 73 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अंबा कारखाना रोडवरील जान्हवी हॉटेल परिसरात काही इसम पत्त्यावर पैसे लावून तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पथकाला तत्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता, सहा जण गोलाकार बसून जुगार खेळताना मिळून आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून खालील सहा जणांना ताब्यात घेतले आहे: 1. मोहम्मद खतीब (वय 50, रा. खतीब गल्ली) 2. सद्दाम बागवान (वय 30, रा. बागवान गल्ली) 3. शेख अजहर जिलानी (वय 48, रा. खतीब गल्ली) 4. श्रीराम बारगजे (वय 39, रा. रायगडनगर) 5. नागनाथ ढगे (वय 22, रा. रायगडनगर) 6. धर्मराज वाघमारे (वय 39, रा. मोरेवाडी) छाप्यादरम्यान पोलिसांनी जुगाऱ्यांच्या ताब्यातून साहित्य जप्त केले असून यात नगदी रक्कम 11,670 रुपये, 1,37,000 रुपये किमतीचे विविध हँडसेट, 3,25,000 रुपये किमतीच्या गाड्या असा एकूण मुद्देमाल: 4,73,670 रुपये पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची यशस्वी कारवाई बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहायक पोलिस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलिस अंमलदार पांडुरंग काळे, हनुमंत चादर, प्रवीणकुमार गिते, सुशांत गायकवाड , भागवत नागरगोजे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT