Ambajogai Smart Meter Issue pudhari photo
बीड

Ambajogai Smart Meter Issue : स्मार्ट मीटरसाठी सक्ती करू नका; अधिकाऱ्यांना निवेदन

ग्राहकांचे आर्थिक मानसिक शोषण व लूट न होण्यासाठी सदर पूर्वसूचनेने संदेशानुसार स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये अशी मागणी

पुढारी वृत्तसेवा

अंबाजोगाई : अंबाजोगाई विभागामध्ये कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय अंबाजोगाई यांच्या वतीने स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्याची भीती महावितरणच्या वतीने दाखवण्यात येत आहे तथा व्हाट्सअप वर महावितरणकडून मेसेज टाकून ग्राहकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्यामुळे आज सर्वपक्षीयांच्या वतीने कार्यकारी अभियंता अंबाजोगाई यांना निवेदन देण्यात आले.

विद्युत वितरण कंपनी मार्फत स्मार्ट मीटर बसवण्यासंबंधी ग्राहकांना किंवा व्हाट्सअप वर तसेच मोबाईलवर पूर्वसुचना प्राप्त झालेली आहे. त्यानुसार ज्या ग्राहकांचे पूर्वीचे मीटर काढून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर नवीन मीटर बसवण्यात आले आहेत त्या विद्युत स्मार्ट मीटरमुळे चार ते आठ पट अधिक बिल येऊन हकनाक भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे असंतोष ग्राहकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे पूर्वीचेच मीटर ठेवण्यात यावे स्मार्ट मीटर बसून ग्राहकांचे आर्थिक मानसिक शोषण व लूट न होण्यासाठी सदर पूर्वसूचनेने संदेशानुसार स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.

स्मार्ट मीटर तांत्रिक व सर्वर एरर सिग्नल अपुरतेमुळे विद्युत बिल आती वाढ होऊ शकते, डेटा रेकॉर्डमुळे ग्राहकांची दिनचर्या माहिती होऊ शकते त्यामुळे व्यक्तिगत जीव जीवन धोका निर्माण होऊ शकतो, स्मार्ट मीटर मुळे बिल भरणा वेळेच्या आत न झाल्यास अवेळी अचानक विद्युत पुरवठा खंडित शकतो व अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

या आशयाचे निवेदन कार्यकारी अभियंता यांना देताना भीमशक्तीचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष भीमराव सरवदे, बीड जिल्हा संघटक जीवन घाडगे, शुभम तरकसे, सुमित आवाडे, अण्णा कुचेकर , लोक जनशक्ती पार्टीचे युवक मराठवाडा प्रदेश अध्यक्ष राजेश वाहुळे, अशोक काळे, गंगाधर पोळ, अझर सय्यद, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सुनील जगताप, तालुका अध्यक्ष नितीन परदेशी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळे, भारतीय काँग्रेसचे नेते संजय वाघमारे परमेश्वर लांडगे, मदन परदेशी व इतर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT