Fertilizer Smuggling 
बीड

Fertilizer Smuggling: बेकायदेशीररीत्या युरिया खताची वाहतूक करणारा ट्रक कृषी विभागाने पकडला

हा ट्रक मालासह आंभोरा पोलीस ठाण्यात नेण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुढारी वृत्तसेवा

आष्टी : तालुक्यातील आंभोरा ते घाटा पिंप्री रस्त्यावर ही धडक कारवाई करण्यात आली. आंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल रॉयल बाईटर्समोर एक संशयास्पद ट्रक (क्रमांक MH-12-FC-7812) अडवण्यात आला. या ट्रकमध्ये कोणतीही अधिकृत कागदपत्रे व वस्तूंविना वाहतूक केला जाणारा 'नर्मदा बायो केम' कंपनीचा २०० बॅग युरिया खताचा साठा सापडला.

प्रत्येकी ४५ किलो वजनाच्या या बॅगेची किंमत ५३ हजार ५०० रुपये असून, ट्रक आणि खताच्या दोनसे गोण्यांसह एकूण २२ लाख ५३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा खताचा साठा व ट्रक अमोल कांतीलाल तळेकर (रा. घाटापिंप्री) यांच्या मालकीचा असल्याचे समोर आले आहे. शासकीय अनुदानानावरील हे युरिया खत बेकायदेशीररीत्या जास्त दराने विक्री करण्यासाठी किंवा औद्योगिक वापरासाठी दुसरीकडे ट्रकवरून नेले जात होते.

तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे व गुण नियंत्रण निरीक्षक नागसेन शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा भरारी पथक प्रमुख सय्यपा गरंडे आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक वल्लभ भोसले यांच्यासह शनिवार, ८ ऑगस्ट रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा सापळा रचून कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुभाश साळवे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड) सहिल सय्यद (कृषी विकास अधिकारी,जिल्हा परिषद बीड) यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी पार पाडली.

या प्रकरणी गुण नियंत्रण अधिकारी नागसेन शिंदे यांच्या फिर्यादीवरून ट्रक मालक अमोल तळेकर यांच्याविरुद्ध रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ चे कलम २६(१)(अ)(ब), जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३(१)(अ)(ii), फर्टिलायझर मुव्हमेंट कंट्रोल ऑर्डर १९७३ चे कलम ३ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१९(४) नुसार आंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा ट्रक मालासह आंभोरा पोलीस ठाण्यात नेण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT