Action by Beed Rural Police; 'Makoka' on accused in firing case
बीड, पुढारी वृत्तसेवा : गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीवर बीड पोलिसांनी अखेर 'मकोका'ची कारवाई केली आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी सफवान खान टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी इमामपूरा रोडवरील पेट्रोल पंपाजवळून फिर्यादी शेख मोहम्मद साद शेख हारुण हे मित्रांसह घरी जात असताना आरोपी त्यांच्याकडे रागाने पाहत असल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस मारहाण करून पिस्तुलातून गोळीबार केला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासात पठाण फरदीन पठाण फैरोज, शिकलकर अरबाज अब्दुल नवाब, सय्यद साद आजम आणि अमान खान नासेर खान पठाण यांच्यासह इतर आरोपींचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, या टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगा, जबरदस्तीने मालमत्ता बळकावणे, मारहाण, गंभीर दुखापत करणे, वस्तू व मालाची नासधूस करणे, जुलूमाने घेणे आणि रस्ता अडविणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे.
गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बीड ग्रामीण पोलिसांनी या टोळीविरुद्ध मोक्का प्रस्ताव अंतर्गत कलम वाढविण्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांच्याकडे पाठविला होता. दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मोका प्रस्तावाला मंजुरी दिली. गोळीबार, मारहाण आणि दहशतीच्या माध्यमातून परिसरात वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर आता 'मोका 'चा फास आवळला आहे. बीड पोलिसांच्या या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, गुन्हेगारी टोळ्यांविरोधात पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला-