Aashti Panchayat Samiti Reservation  (Pudhari Photo)
बीड

Aashti Panchayat Samiti Reservation | आष्टी पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर : तहसीलदार वैशाली पाटील

आष्टी तालुक्यात एकुण १४ पंचायत समिती गण असून यातील अनुजाती-पारगांव हे अनु जाती महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

कडा : तालुक्यातील पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडत जाहीर आज सोमवार (दि.१३) रोजी दुपारी १ वा. तहसिल कार्यालयातील सभागृहात नियत्रंय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रो.ह.यो. बीड प्रभोदय मुळे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसिलदार वैशाली पाटील संपन्न झाली.

आष्टी तालुक्यात एकुण १४ पंचायत समिती गण असून यातील अनुजाती-पारगांव हे अनु जाती महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले. त्यानंतर राहिलेल्या १३ गणातून ४ गण नागरीकांचा मागास वर्गासाठी चिठ्ठया टाकण्यात आल्या. यातून पिंपळेश्वर विद्यालयातील इयत्ता तिसरी तील सिध्देश्वर संभाजी गोरे याच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

यामध्ये नागरीकांचा मागास प्रवर्ग साठी मुर्शदपुर,कडा,लोणी (स),व दौलावडगांव साठी राखीव झाले. यातून दोन गण महिलांसाठी राखीव करण्यासाठी राखीव झाले. यानंतर उरलेल्या नऊ चिठ्या टाकून यातून सर्वसाधारण साठी साठी टाकून यातील ४ चिठ्ठया महिलेसाठी राखीव म्हणून टाकळी अमिया, धामणगांव,देवळाली,शिराळ हे गण झाले.

आष्टी तालुक्यातील पंचायत समिती गणाचे आरक्षण पुढील प्रमाणे

★दौलावडगांव-ओबीसी (महिला)

★देवळाली-सर्वसाधारण (महिला)

★धामणगांव-सर्वसाधारण महिला

★सुरूडी- सर्वसाधारण

★डोंगरगण- सर्वसाधारण

★धानोरा- सर्वसाधारण

★लोणी (स)-ओबीसी (महिला)

★टाकळी अमिया-सर्वसाधारण (महिला)

★कडा-ओबीसी (पुरुष)

★शिराळ-सर्वसाधरण (महिला)

★मुर्शदपुर-ओबीसी (पुरुष)

★पांढरी-सर्वसाधारण

★आष्टा (ह.ना.)-सर्वसाधारण

★पारगांव (जो)-अनु जाती (महिला)

या आरक्षण सोडतीच्यावेळी नायब तहसिलदार प्रकाश सिरशिवाड, पोलिस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे यांच्यासह गणेश शिंदे,नगराध्यक्ष जिया बेग,माऊली जरांगे,रंगनाथ धोंडे,सुरेश भिसे,रवि पाटील ढोबळे, रामभाऊ खाडे,छगन कर्डीले,पत्रकार प्रविण पोकळे,अविनाश कदम,गणेश दळवी,रघुनाथ कर्डीले,राजेंद्र जैन, आदी सह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT