A gang of three inn thieves were caught by the Cage police
केज : पुढारी वृत्तसेवा
केज येथील बस स्टैंड वारंवार होणाऱ्या चोऱ्या रोखण्यात पोलिसांना यश मिळाले असून पोलिसांनी तिघांची टोळी ताब्यात घेतली आहे. या पकडलेल्या आरोपी पैकी एकावर खुनाचा गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची असून कारागृहातून पॅरोलवर सुट्टीवर आल्या पासून पुन्हा कारागृहात गेलेला नव्हता. तो फरार होता. तर दुसरा आरोपी हा त्याच्यावर राज्यात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात चोरीचे आणि इतर एकूण १६ गुन्हे दाखल आहेत. तर तिसरा मात्र केज बस स्थानकात हमाली करणारा हमाल असून तो त्यांना प्रवाशांची माहिती देत होता.
दि. ११ जून रोजी सकाळी ११ वा. चे सुमारास अमरजित विजयकुमार धपाटे ही त्यांचे कॉफी शॉपचे कॉफी मटेरीअलचे पार्सल आनण्यासाठी बसस्थानक केज येथे गेले होते. ते बसची वाट पाहत थांबले असता तेथे दोन अनोळखी ईसम जवळ आले व त्यांनी तुमच्याकडे माझे काम आहे असे म्हणाले आणि त्यांना बसस्थानाकाचे बाजुला कोपऱ्यात घेऊन गेले.
त्यापैकी एकाने त्याचे कंबरेतून एक चाकू काढले व माझ्या गळ्याला लावून तुझ्या खिशातील जेवढे पैसे आहे ते काढून दे. नाही दिले तर जिवेच मारून टाकूत अशी धमकी दिली. त्या तिघांनी बळजबरीने त्याच्या खिशातील २ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर अमरजित धपाटे याने आरडाओरड केली ते ऐकून असता बसस्थानकामधील काही लोक आणि बस स्टैंड परिसरातील पोलिस मदत केंद्रात कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी पोलिस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सो पणे आणि पोलिस हेडकॉन्स्टेबल विष्णू नागरगोजे प्रवाशी धावून आले.
पोलिस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपणे आणि पोलिस हेडकॉन्स्टेबल विष्णु नागरगोजे पोलिसांनी त्यांच्या मदतीने पळून जाणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या. ताब्यात घेतलेले संशयितांची नावे अन्वर ऊर्फ असलम दस्तगीर सय्यद, (रा. वडसावीत्री नगर परळी ता. परळी जि. बीड), अंबादास सुखदेव साळोकार, वय (४४ वर्ष), (रा. घारपुरी ता. खामगाव जि. बुलढाणा) आणि हमीद दाऊत शेख, (रा. धारूर जि. बीड) अशी आहेत. केज पोलिस ठाण्यात अमरजित धपाटे याच्या फिर्यादी नुसार या तिघा सराईत गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत चोऱ्या प्रकरणी हवा असलेला अंबादास साळोकार, खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला पळालेला अन्वर सय्यद आणि हमाली करण्याच्या बहाण्याने खाकी कपडे घालून त्यांना माहिती देणारा त्यांचा साथीदार हमीद शेख यांचा पर्दाफाश करणारे पोलिस निरीक्षक वैभव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलिस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने, पोलिस हेडकॉन्स्टेबल विष्णू नागरगोजे, शमीम पाशा, बजरंग मुंडे आणि गुप्तवार्ता शाखेचे शिवाजी कागदे यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचा पोलिस खात्याने सन्मान करण्याची मागणी होत आहे.