Illegal Liquor : बीड शहर परिसरात अवैध दारुचा महापूर ! file photo
बीड

Illegal Liquor : बीड शहर परिसरात अवैध दारुचा महापूर !

शिवाजीनगर पोलिसांच्या कारवाईतून हिमनगाचे टोक आले समोर; नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

A flood of illegal liquor in the Beed city area!

बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड शहर आणि ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारुचा अक्षरशः महापूर आला आहे. बिर्याणी हाऊस आणि प्रत्येक रस्त्यावर शहरापासून काही अंतरावर असलेल्या धाब्यांवर सर्रास अवैध दारु विक्री होत असल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. या एकाच कारवाईत अवैध दारु साठ्यासह नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बीड शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शिवाजीनगर, पेठबीड, बीड शहर व ग्रामीण असे तब्बल चार पोलिस ठाणे आहेत. याबरोबरच नेकनूर आणि पिंपळनेर पोलिस ठाण्याची हद्द देखील बीड शहर परिसरात आहे. यामुळे पोलिसांनी ठरवले तर अवैध दारु विक्री, अवैध धंदे चालूच शकणार नाहीत.

परंतु कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक नवनित कावत यांच्या परस्पर बीड शहर व परिसरात अवैध धंदे चालकांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय तर दुसरीकडे अवैध दारु विक्रीचा महापूर आल्याचे दिसते. सर्रासपणे चालणारे हे गैरप्रकार बीडमधील चार आणि नेकनूर, पिंपळनेर पोलिसांना दिसत नसतील का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. बीड शहरात फुटाफुटावर बिर्याणी हाऊस उघडले आहेत.

या बिर्याणी हाऊसवर बिर्याणी कमी आणि दारु जास्त मिळत असल्याचे दिसते. या सर्व प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. पार्सल बॉटल घेवून जायचे आणि बिर्याणी हाऊसमध्ये पित बसायचे किंवा त्या ठिकाणच्याच वेटरला सांगताच हवा तो ब्रँड मिळत असल्याचे दिसते. अशीच परिस्थिती जालना रोड, नगर रोड, बार्शी रोड, परळी रोड, नाळवंडी रोड, पिंपळनेर परिसर, मांजरसुंबा परिसरात देखील आहे.

या सर्व रस्त्यांवर धाब्यांचे उदंड पिक आले असून अनलिमिटेड थाळी सोबत हवी ती दारु देखील मिळत अवध असल्याने खव्वय्ये आणि तळीरामांना मोकाट रान मिळाले आहे. यामुळे परवानाधारक बिअरबार मालक देखील हैराण झाले असून शासनाचा कोट्यावधीचा महसूल देखील बुडत आहे. या सर्व प्रकाराच्या हिमनगाचे एक टोक शिवाजीनगर पोलिसांनी आपल्या कारवाईत दाखवून दिले आहे.

शहरा जवळील चराटा फाटा येथील अश्विनी हॉटेलमध्ये छापा विनापरवाना दारूविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर टाकला. यावेळी हॉटेलचा मालक बाजीराव भानुदास भगवानराव देशमुख (रा. संभाजीनगर, बीड) याच्या मुद्देमाल ताब्यातून देशी-विदेशी दारूच्या सिलबंद बाटल्या, मोबाईल, मोटारसायकल व इतर साहित्य असा एकूण 9 लाख 3 हजार 600 रुपयांचा जप्त करण्यात आला. ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पो. नि. शीतलकुमार बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस अंमलदार राजू पोटे, राजू पाटील, नितीन भोंडवे, शुभम सोनवणे, सुनील आडे, अफताब शेख आणि नवनाथ डाके यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT