Farmers Sucide In Beed
शेतकऱ्यांने गळफास घेवून संपवले जीवन Pudhari Photo
बीड

बीड : माळेगाव येथे शेतकऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे : केज

केजमधील माळेगाव येथील शेतकऱ्याने शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना शनिवारी (दि.27) घडली. धनराज भगीरथ गव्हाणे (वय.४९) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत धनराज गव्हाणे यांची सर्वे नं.१७ मध्ये तीन एकर शेती आहे. तसेच ते धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे एका दुकानावर कामाला देखील होते. शेतीच्या उत्पन्नावर आणि कामातून मिळालेल्या पैशातुन पत्नी व दोन मुलासह कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. मयत धनराज गव्हाणे यांनी नातेवाईकांकडून हातउसने पैसे घेतले होते. त्याची परतफेड करण्याच्या चिंतेने ते कमालीचे अस्वस्थ होते. याच आर्थिक विवंचनेतून त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून जीवन संपवले.

सदर घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल भगवान खेडकर व पोलीस नाईक कोंडीबा मेहत्रे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. युसुफवडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्या नंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

SCROLL FOR NEXT