अमरावती : 11 व्या मजल्यावरून उडी घेऊन अल्पवयीन मुलीने संपवले जीवन

अमरावतीमधील ड्रीम्स प्राईड सदन येथील घटना
Minor Girl Sucide In Amravati
11 व्या मजल्यावरून उडी घेऊन अल्पवयीन मुलीने संपवले जीवन Pudhari Photo
Published on
Updated on

शहरातील तापडिया मॉलच्या मागील ड्रीम्स प्राईड या सदनिकेतील अकराव्या मजल्यावरून उडी घेऊन एका १७ वर्षीय मुलीने जीवन संपवले. हर्षिता विजय तेलखडे (वय १७, चंदन नगर, साईनगर) असे मृत मुलीचे नाव आहे. जीवन संपवल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही घटना शुक्रवारी (दि.26) रोजी सायंकाळच्या दरम्यानची आहे.

Minor Girl Sucide In Amravati
सावकार माजले! थकित कर्जापोटी मोटरसायकल ओढून नेली; युवकाने जीवन संपवले

एक मुलगी सदनिकेवरून खाली पडल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी तेथे धाव घेतली. नागरिकांनी तिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करुन या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचमामा केला आणि मृत मुलीचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. ही मुलगी चंदननगर परिसरातील राहणारी असून, ती दर्यापूर येथे शिक्षण घेत होती. तिने सोबत आणलेली मोपेड वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांना देण्यात आली. राजापेठ पोलिसांसह पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते.

घटनास्थळावरून मोबाईल जप्त

माहितीनुसार, घटनास्थळावरून पोलिसांनी मृत विद्यार्थिनीचा मोबाईल जप्त केलेला आहे. या मोबाईल वरून पोलिसांना काही माहिती मिळते का याचा तपास केला जात आहे. मृतक विद्यार्थीनी तिथे कशी काय पोहोचली? याचा पण तपास पोलीस करत आहे.

Minor Girl Sucide In Amravati
६५ वर्षांच्या वयोवृद्ध हिरे व्यापार्‍याने संपवले जीवन

हंबरडा फोडत आई-वडिल घटनास्थळी

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षिता नेहमीप्रमाणे सायंकाळी ट्युशनला गेली होती. आई-वडिलांना वाटत होतं की ती ट्युशनला गेली आहे. मात्र त्यांना राजापेठ पोलिसांनी फोन करून या घटनेची माहिती दिल्यावर त्यांना घटनास्थळावर बोलावण्यात आले. आई-वडिलांना सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले. सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे. अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलिस घेत आहे. मृतक विद्यार्थीनी बाराव्या वर्गामध्ये शिकत होती. तिने दर्यापूरच्या एका कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतली होती आणि शहरात ट्युशन देखील लावली होती. ट्युशनसाठी ती घरून निघाली होती. त्यानंतर ही घटना झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news