Beed News : जबाबदारीची दिवाळी; पाणी बचतीसाठी सहकार्य करावे : गीताभाभी पवार file photo
बीड

Beed News : जबाबदारीची दिवाळी; पाणी बचतीसाठी सहकार्य करावे : गीताभाभी पवार

गेवराई तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने, ग्रामीण भागात पाण्याचे संकट ऊभे राहीले आहे.

पुढारी वृत्तसेवा

A Diwali of Responsibility; Please Cooperate to Conserve Water: Geeta-bhabhi Pawar

गेवराई, पुढारी वृत्तसेवा गेवराई तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने, ग्रामीण भागात पाण्याचे संकट ऊभे राहीले आहे. त्यामुळे, पाणी बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करून, यंदाची दिवाळी उत्साहात पार पाडण्याचा जबाबदारी पार पाडावी असे आवाहन नगराध्यक्षा गीताताई पवार, मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांनी केले आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद गेवराईच्या नागरिकांना पाणी बचत व चार प्रकारच्या कचरा विलगीकरणाचे आवाहन आपल्यापुढे असून, यंदा निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याची मर्यादा लक्षात घेता, संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज बनली आहे.

दिवाळी हा आनंद, उत्साह आणि अंधारावर मात करून प्रत्येकाचे आयुष्य प्रकाशामय व्हावे, अशी प्रार्थना करत दीपोत्सव साजरा करताना, पाणी बचत, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करणारी दिवाळी ठरावी, असे आवाहन नगर परिषद गेवराईच्या वतीने करण्यात आले आहे.

पाण्याचा अनावश्यक वापर सुरू राहिल्यास भविष्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होऊ शकते. पाणी वाचविले, तरच उद्याची तहान भागणार आहे. घराची साफसफाई, फरशी व अंगण धुण्यासाठी बादलीचा वापर करावा, पाण्याची टाकी भरल्यानंतर मोटार त्वरित बंद करून पाणी ओसंडून वाहात जाणार नाही, याची काळजी घेत यंदाचा दिवाळी सण साजरा करत, दिवाळीचा दीप उजळताना पाण्याचा प्रत्येक थेंब जपूया.

ही दिवाळी केवळ दिव्यांच्या प्रकाशाची नव्हे, तर पाणी बचतीच्या जागृतीची ठरू दे, प्रत्येक घरात आनंद नांदू दे आणि गेवराई शहराचा सर्व परिसर स्वच्छ व सुंदर रहावा यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावा, दिवाळीच्या सणात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो, कचरा एकत्र न टाकता घरच्या घरी चार प्रकारामध्ये वेगळा करून नगर परिषदेच्या घंटागाडीमध्ये टाकून जबाबदारी पार पाडावी असे आवाहन ही नगराध्यक्षा गीता बाळराजे पवार, उपाध्यक्षा रेवती भगवान घुंबार्डे, मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT