Beed Crime News | परळीतील एका नागरिकाचे भररस्‍त्‍यातून अपहरण, पाच ते सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल  File Photo
बीड

Beed Crime News | परळीतील एका नागरिकाचे भररस्‍त्‍यातून अपहरण, पाच ते सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

बीड जिल्‍ह्यात अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

A citizen of Parli was kidnapped from a busy road, a case was registered against five to six people

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा

बीड जिल्ह्यातील अपहरणांच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून गाजत असतांनाच आता परळीतील एका नागरिकाचे भरस्त्यावरुन अपहरण झाल्याची घटना (दि.६) सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी रात्री उशीरा ११.१७ वाजता परळीच्या संभाजीनगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दिनांक 06/05/2025 रोजी सायंकाळी राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक ते गणेशपार रोड या मुख्य रस्त्यावरील एका हॉटेल जवळून अपहरणाची घटना घडली आहे. यातील पीडित इसम शेख अमजेद अहमद शेख (वय 35 वर्ष) रा. बरकत नगर परळी यास अनोळखी पाच ते सहा लोकांनी पकडून रोडवर उभ्या केलेल्या पांढर्‍या रंगाच्या कारमध्ये बळजबरीणे टाकुन त्याचे अपहरण करुन घेवुन गेले.

या विषयीची फिर्याद शेख जमीर शेख आमीर रा. खुदबे नगर परळी यांनी दिली आहे. यावरुन आरोपी अनोळखी ईसम पाच ते सहा जणांविरुद्ध पोलिस स्‍टेशन संभाजीनगर परळी वै. येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT