A case has been registered against a person for assaulting a soldier's father.
गौतम बचुटे/केज :-
शेतजमीन मोजणीच्या कारणावरून देशाची सेवा करीत आलेल्या एका संरक्षण सेवेतील सैनिकाच्या वडीलांस दुचाकीवर बसवून नेऊन त्यांना दगड व लाथाबुक्याने मारहाण केल्याची घटना चिंचोली माळी ता. केज येथे घडली.
चिंचोली माळी ता. केज येथील शकरगंज बन्सी पठाण वय (५५ वर्ष) हे पत्नीसह गावात वास्तव्यास असून त्यांचा मुलगा भारतीय सैन्य दलात आहे. १७ एप्रिल रोजी सकाळी ८:०० वाजता ते पत्नी रुकसाना हिच्यासह गावाच्या वेशीत उभे राहिले होते.
यावेळी त्यांच्या शेताजवळून जाताना साहेबा गणपती बोर्डे हे त्यांच्याकडे दुचाकीवरून आले. बोर्डे यांनी शकरगंज यांना दुचाकीवर बसवून शाळेजवळ नेले. तेथे दुचाकी वरून उतरून त्यांना शेतजमीन मोजणीच्या कारण काढून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ सुरू केली. इतक्यावरच न थांबता त्यांना दगडाने मारहाण केली. तसेच मुक्कामार दिला.
यावेळी त्यांना मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देऊन तो निघून गेला. अशी तक्रार शकरगंज पठाण यांनी दिली. या तक्रारीवरून साहेबा बोर्डे विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.