340 arms licenses cancelled in Beed; 285 people deposited arms
बीड, पुढारी वृत्तसेवा: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांबरोबरच मृत्यू झालेल्या तसेच उपयोगात नसलेले शस्त्र परवाने रद्द करण्याची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ३४० परवाने रद्द करण्यात आले होते, त्यापैकी जणांनी २८५ आपले शस्त्र संबंधित पोलिस ठाण्यात जमा केले आहेत.
बीड जिल्ह्यात वितरित करण्यात आलेले शस्त्र परवाने व त्यातील काही परवानाधारकांकडून त्याचे केले जात असलेले प्रदर्शन हा चर्चेचा विषय ठरला होता. काही शस्त्र परवाना धारकांनी फायरिंग करतांनाचे व्हिडीओ साशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर याबाबत आवाज उठवण्यात आला होता.
यानंतर जिल्हाभरात वितरित करण्यात आलेल्या शस्त्र परवान्यांचा आढावा घेत गुन्हेगारी पार्श्वभूमी, शस्त्र परवानाधारकाचा झालेला मृत्यू, शस्त्र परवाना उपयोगात नसणे यासह इतर काही त्रुटी आढळताच सदर परवाने रद्द केले जात आहेत. यामध्ये आतापर्यंत ३४० परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्यापैकी २८५ जणांनी आपले शस्त्र संबंधित पोलिस ठाण्यात जमा केले असून उर्वरित परवानाधारकांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत, त्यांनादेखील आपल्याकडील शस्त्र संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये जमा करावे लागणार आहेत.
ज्या शस्त्र परवानाधारकांचा परवाना रद्द झाला आहे, त्यांनी विहित मुदतीमध्ये संबंधित पोलिस ठाण्यात ते जमा करणे आवश्यक असते. परंतु अद्यापही ५५ जणांनी आपले शस्त्र परवाने जमा केलेले नाहीत. अशा पद्धतीने शस्त्र बाळगणे हे अवैध ठरते. त्यामुळे कारवाई देखील होऊ शकते.