3 lakh 94 thousand cannabis trees seized!
केज, पुढारी वृत्तसेवा: केज तालुक्यातील सुर्डी येथे शेतातील पिकात ३ लाख ९४ हजार रु. किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २३ जून रोजी युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांना एका गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, सुर्डी ता. केज येथील शिवारात सिद्धेश्वर तुकाराम ठोंबरे याचा शेतातील पिकात गांजाची झाडे आली आहेत.
अशी खात्रीशीर माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी ही माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचा समक्ष कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाच्या झाडांचे वजन १९.७०० किलो ग्रॅम भरले आहे.
जप्त केलेल्या गांजाची किंमत ३ लाख ९४ हजार रु. आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. युसुफवडगाव पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुंगीकारक औषधद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.