मराठवाडा

बीड : अत्याचार प्रकरणातील नगरसेविकेच्या आरोपी पतीला अखेर अटक

backup backup

केज; गौतम बचुटे : परित्यक्ता महिलेला बळजबरीने पळवून नेऊन लग्नाचे अमिष दाखवत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या व पीडित महिलेचा गर्भपात करणाऱ्या कथित नेता अखेर तीन महिन्यानंतर पोलिसांच्या ताब्यात आला. अखेर त्याने पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले.

परित्यक्ता महिलेला बळजबरीने पळवून नेऊन लग्नाचे अमिष दाखविले, त्यानंतर तिच्यावर वारंवार बलात्कार करून तिचा गर्भपात केला. या प्रकरणी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या विरोधात बलात्काराचा, अवैद्य गर्भपात आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणातील आरोपी हा एका नगरसेविकेचा पती आहे. गुन्हा नोंद होऊनही त्याला अटक झालेली नव्हती, अखेर तीन महिन्यानंतर आता तो पोलिसांच्या ताब्यात आला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे प्रशिक्षणाला गेल्यानंतर आरोपीने आत्मसमर्पण केले.

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

आरोपी सुग्रीव कराड याने लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केला. यानंतर पीडित महिला दोन महिन्यांची गर्भवती असताना, बळजबरीने तिला आरोपीने गर्भपाताच्या गोळ्या खायला देऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. आरोपी हा जनविकास परिवर्तन आघाडीच्या नगरसेविका यांचा पती आहे.

गुन्हा दाखल केल्या प्रकरणी पीडितेच्या महिलेच्या घरी जाऊन दिली धमकी

पीडितेने केज पोलीस ठाण्यात सुग्रीव कराड विरोधात तक्रार दिली. त्यानंतर आरोपी सुग्रीव माणिक कराड, त्यांची पत्नी नगसेविका आशा सुग्रीव कराड, पंचायत समिती सदस्या मुक्ता माणिक कराड, मिरा मच्छींद्र चाटे, एक अनोळखी महिला यांनी पीडितेच्या घरी जाऊन तिचा मोबाईल हिसकावून घेऊन तिच्या जवळील पैसे घेऊन तिला मारहाण करत शिवीगाळ केली.

केज तहसील कार्यालयासमोर महिलेचे चार दिवसांचे उपोषण

या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात बलात्कार, अवैद्य गर्भपात आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होऊनही आरोपी फरार होता. त्यामुळे आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी पीडितेने तिचे वृद्ध आई-वडील आणि मुलींसह केज तहसील कार्यालयासमोर चार दिवस उपोषण केले होते.

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार केजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी आरोपी सुग्रीव याला लवकरच अटक करण्याचे लेखी आश्वासन दिल्या नंतर पीडित कुटुंबाने आमरण उपोषण मागे घेतले होते. दरम्यान रविवारी (दि.२४ सप्टेंबर ) सायंकाळी ६:०० वा. च्या दरम्यान आरोपी सुग्रीव यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

'या' पोलीस अधीक्षकांनी पदभार स्विकारल्यानंतर आरोपीने केले आत्मसमर्पण

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे प्रक्षिशणाला गेले असल्याने केजचा पदभार बीडचे पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्याकडे आल्यानंतर आरोपीने स्वतःहून आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता २८ सप्टेंबर पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी प्रभारी पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT