मराठवाडा

बीड : विद्युत फॅाल्ट काढण्यासाठी युवकाची जीवघेणी कसरत; नागरिकांकडून कौतुक

backup backup

गेवराई (बीड); पुढारी वृत्तसेवा : कुठे कामात कसूर केली म्हणून अनेकांना अधिकारी व नागरिकांच्या बोलण्याला तोंड द्यावे लागते. तर कुठे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे कौतुक होते. असाच एक प्रकार तालुक्यातील धोंडराई येथे रविवारी (दि.12 रोजी) आपल्या जिवाची परवा न करता लाईटचा फॅाल्ट काढण्यासाठी एक तरूण विद्युत खांबावर चढला. आपले कर्तव्य बजावणाऱ्या या तरूणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असून, त्याचे कौतुक होत आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील धोंडराई या ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे काही काळ गाव अंधारात होते. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीचे वायरमन विद्युत फॅाल्ट काढत असताना एका विद्युत खांबाजवळ आले. खांबाच्या सभोवती काटेरी बाभळीचे झाड असल्याने विद्युत खांब्यावर चढणे अवघड होते. या खांबावर चढणे अशक्य असतानाही युवकाने हे धाडस केले.

धोंडराई येथे काम करणाऱ्या व तालुक्यातील बेलगाव येथील रहिवासी असलेले कर्मचारी संभाजी सकार्डे यांनी हे धाडस केले. गाव अंधारात राहू नये यासाठी चक्क विद्युत खाबाच्या आधारासाठी लावलेल्या तारेचा हाताने रोपवे करुन विद्युत खांबावरील फॅाल्ट काढून अंधारातील गावांना उजेडात आणले. त्याने आपल्या कर्तव्याचे पालन केल्याने त्यांचे कौतुक होत असून त्याचा विद्युत खांब्यावर चढतानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT