मराठवाडा

बीड : एनीडेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून डॉक्टरची ७५ हजारांची फसवणूक

backup backup

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : फ्लिपकार्टवरुन आलेले पार्सल परत करण्यासाठी गुगलवर कंपनीचा कस्टमर केयर नंबर सर्च करणे, एका डॉक्टरांना चांगलेच महागात पडले. गुगलवरील नंबर अनेकदा सायबर गुन्ह्यातील आरोपींनी अपलोड केल्याचे यापूर्वी अनेकदा स्पष्ट झाले आहे. संबंधीत डॉक्टरांनी गुगल सर्च करून एक मोबाईल नंबर मिळवला. मात्र, त्या मोबाईलवरून बोलणार्‍या लुटारूने त्यांना एनीडेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्याने मोबाईलमधील सर्व डाटा संबंधीत लुटारुला कळाला. त्याने  डॉक्टरांच्या खात्यातील ७५ हजारांची रक्कम विड्रॉल करत चुना लावला. याप्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. शामसुंदर दगडूराम काकणी (रा.समता कॉलनी) असे फसवणूक झालेल्या डॉक्टराचे नाव आहे. फ्लिपकार्टवर त्यांनी एक पार्सल मागवले होते. मात्र, ते पार्सल त्यांना परत करायचे होते. त्यासाठी त्यांनी गुगल सर्च करून फ्लिपकार्ट कस्टमर केयरचा नंबर शोधला. तेथे त्यांना इंडिया कस्टमर केयर असा उल्लेख आढळला. तसेच त्याठिकाणी कॉल नॉउ असा उल्लेख असल्याने त्यावर त्यांनी क्लिक केले. दरम्यान, एक नंबर स्क्रिनवर दिसला.

काकणी यांनी त्या नंबरशी संपर्क केला असता समोरून बोलणार्‍या अनोळखी व्यक्तीने मोबाईलमध्ये एनीडेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवत डॉ.काकाणी यांनी ते अ‍ॅप डाऊनलोड केले. इथेच त्यांची फसवणूक झाली. पार्सल तर परत पाठवता आलेच नाही. मात्र, संबंधित लुटारूने त्यांच्या खात्यातील ७५ हजार रुपयांना चुना लावला. माजलगाव शहर ठाण्यात डॉ.काकाणी यांच्या फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT