मराठवाडा

बीड: चुलत्याने पुतण्याच्या डोक्याला पिस्तुल लावून तोंडावर फेकले ॲसिड

अविनाश सुतार

केज: पुढारी वृत्तसेवा: केज तालुक्यात शेतीच्या वादातून चुलत्याने पुतण्याच्या डोक्याला पिस्तुल लावून तोंडावर ॲसिड टाकून मारहाण केली. ही घटना केज येथे घडली आहे. या प्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १० फेब्रुवारीरोजी सायंकाळी ६ च्या सुमारास हार्वेस्टर ऑपरेटर राहुल रामहरी वायबसे केज येथील मार्केट यार्डात कोंबडीचे खाद्य आणण्यासाठी गेले होते. खाद्य घेऊन घरी जाताना मार्केट यार्डच्या कमानीजवळील साई फटाके सेंटर समोर राहुलचे चुलते संभाजी आणि त्यांचे साथीदार उभे होते. यावेळी राहुलला अडवून संभाजी वायबसे यांनी त्याच्या डोक्याला पिस्तुल लावले. तर प्रमोद डोईफोडे याने राहुलच्या तोंडावर ॲसिड फेकले. या घटनेनंतर राहुल घरी गेला. आणि १२ फेब्रुवारीरोजी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल झाला.

याप्रकरणी गुरूवारी (दि.१६) केज पोलीस ठाण्यात सुदर्शन घुले, अजय तांदळे, सखाराम बन्सी कदम, लक्ष्मण किसन वायबसे, संभाजी महादेव वायबसे, प्रमोद बाबुराव डोईफोडे, अश्विनी लक्ष्मण वायबसे आणि प्रमोद डोईफोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT