धारूर (जि. बीड), पुढारी वृत्तसेवा : धारुर शहरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून याप्रकरणी धारुर पोलिसात दोन आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीत नोंदवलेल्या जबाबानुसार नरसिंह फोटो स्टुडिओ येथे पासपोर्ट फोटो काढण्यासाठी गेली असता यातील आरोपी याने पासपोर्ट फोटो काढून त्या दिवशी न देता फिर्यादीला दुसर्या दिवशी नरसिंह फोटो स्टुडिओ येथे बोलावून घेऊन तिचे इच्छे विरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध केले व सदरील गोष्ट कोणास सांगितल्यास मी तुझ्या भावाला मारून टाकेल अशी धमकी दिली.
तसेच दुस-या आरोपीने याने फिर्यादी व दोन्ही आरोपी हे एका दिवशी तिघेजण नरसिंह फोटो स्टुडिओमध्ये गप्पा मारत बसले असता पहिला आरोपी फोटो काढण्याच्या कामासाठी बाहेर गेला. यावेळी यातील दुस-या आरोपीने फिर्यादी सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले व ही गोष्ट कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
धारूर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी मधूर बालासाहेब फरतडे व सहदेव चाळक दोन्ही (रा. धारुर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 376, 504 भादवि व कलम 4,5 पोस्को ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक व्ही. एस आटोळे करीत आहेत.
हे ही वाचलं का