मराठवाडा

बीड : केज तालुक्यातील मस्साजोग येथील ४५ वर्षीय युवकाची आत्महत्या

अविनाश सुतार

केज, पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील मस्साजोग येथील आंबे नावाच्या शिवारात ४५ वर्षीय विवाहित तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. ही घटना आज (मंगळवार) घडली. दत्तात्रय लक्ष्मण गायकवाड (वय ४५ ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नांव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, केज तालुक्यातील मस्साजोग येथील दत्तात्रय गायकवाड या तरुणाने मस्साजोग शिवारातील आंबे नावाने ओळखल्या जात असलेल्या शेत शिवारात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. या आत्महत्येचे अद्याप कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुंडे करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : पहिली मालिका ते पहिला क्रश | Rapid Fire with aayush sanjeev

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT