मराठवाडा

औरंगाबाद : अंबाडी प्रकल्पात बुडाला २८ वर्षीय तरुण

backup backup

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : शनिवार (दि.४ जून) रोजी शहरानजीक असलेल्या अंबाडी प्रकल्पात पोहण्यासाठी गेलेला मुंबईचा तरुण बुडल्याची घटना घडली आहे. इम्रान शेख ( वय २८ रा. सांताक्रूझ वाकोला मुंबई) हा कन्नड शहरातील सायद कुरेशी खालिद कुरेशी या मित्रा सोबत त्याच्या नातेवाईकांकडे सुट्टी घालवण्यासाठी आला होता.

शनिवारी ( दि. ४ जून)रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान शहरा जवळ असलेल्या अंबाडी प्रकल्पावर पोहण्यासाठी गेला असता तो पाण्यात बुडाला. ही माहिती मिळताच बीट जमादार,जयंत सोनवणे, पोहेका आर बोंदरे यांच्या सह कुरेशी यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा पर्यंत शोधकार्य सूरु होते. मात्र,सदर तरुणाचा शोध लागला नाही. रात्री अंधार असल्याने शोध कार्यास अडथळा होता. त्यामुळे सकाळी शोध कार्य सुरू होईल,अशी माहिती पोहेका आर यु बोंदरे यांनी दिली आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT