हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोलीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आज (दि.21) आंदोलन केले. यावेळी महात्मा गांधी चौकात कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यानंतर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विनायक भिसे- पाटील, तालुकाप्रमुख भानुदास जाधव, हिंगोली विधानसभा संघटक उद्धव गायकवाड, जिल्हा संघटक हिंगोली विधानसभा बाळासाहेब मगर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जिल्हाध्यक्ष विजय शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे, माजी नगराध्यक्ष जगजीत खुराणा, यासह शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.