कोल्हापूर

सतेज पाटील यांची टीका संघाचा लौकिक वाढवत होती काय? ; गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांचा सवाल

मोनिका क्षीरसागर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
'गोकुळ'च्या कारभाराबाबत आपण आज रीतसर मुद्द्यांना धरून प्रश्‍न विचारल्यावर संघाची बदनामी होत असेल तर पातळी सोडून गेली दहा वर्षे निरर्थक टीका करणारे सतेज पाटील तेव्हा संघाचा लौकिक वाढविण्याचे काम करत होते का ? असा थेट सवाल
गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी शनिवारी पत्रकाद्वारे केला आहे.

गोकुळच्या वर्षपूर्तीनिमित्त संघातील (गोकुळ) सत्ताधार्‍यांचा वर्षभराचा अनागोंदी कारभार आपण जनतेसमोर मांडला. आपल्या प्रश्‍नांना गोकुळमध्ये उत्तरे दिली जात नसल्यानेच नाईलाजास्तव त्याबाबत जाहीर बोलावे लागले. गोकुळ म्हणजेच जग समजून चार भिंतीच्या आत मनमानी कारभार करणारे हुकूमशहा अखेर आज जनतेसमोर आले. पण प्रश्‍नांना समाधानकारक उत्तर ते देऊ शकले नाहीत. म्हणूनच मी पुन्हा एकदा त्यांना जाहीरपणे दहा प्रश्न विचारत आहे. त्?याची त्?यांनी उत्तरे द्यावीत. तत्पूर्वी मी रीतसर मुद्द्याला धरून प्रश्‍न विचारल्यावर संघाची बदनामी होत असेल तर गेली दहा वर्षे सतेज पाटील पातळी सोडून निरर्थक टीका करायचे तेव्हा ते संघाचा लौकिक वाढवायचं काम करत होते का ? याचा प्रथम खुलासा करावा.

2017 मध्ये सतेज पाटील सातत्याने विचारायचे की, ग्राहकांवर दरवाढ लादून खरेदी दर का वाढवले? मग आता तुम्ही काय वेगळं कर्तृत्व गाजवलं? त्यातही विक्री दरात वाढ किती केली? आणि मोबदला म्हणून शेतकर्‍यांना किती रुपये दिले? आधी पुणे-मुंबई, त्यानंतर इतर विभाग आणि शेवटी 'उत्तर'च्या निवडणुकीनंतर कोल्हापूरमध्ये दरवाढ केली. या सगळ्या गोंधळात किती फायदा आणि तोटा झाला, याचा सविस्तर लेखाजोखा ते का मांडत नाहीत? आम्ही वचनपूर्ती केली असे अभिमानाने सांगत आहात मग ग्राहकांवर भार टाकला. टँकरच्या वाहतुकीत 5 कोटींची बचत केली म्हणणार्‍यांना ती बचत शक्य झाली. कारण जुने ठेकेदार कमी दरात वाहतूक करत होते. नवीन ठेका दिला त्याचे दर काय ते जाहीर करावेत. कोणाच्या मालकीचे किती टँकर ते सांगा आणि ते जुन्या दरात वाहतूक करतात का हे स्पष्ट करून ठेका देताच एका दिवसातच त्यांना दरवाढ द्यायला डिझेलचे दर एका रात्रीत वाढले काय, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
वासाचे दूध कमी झाले म्हणताय तर त्या वासाच्या दुधाची मागील 3 वर्षांची तुलनात्मक माहिती का जाहीर करत नाही? असाही प्रश्न महाडिक यांनी विचारला आहे.

महाडिक मोठ्या मनाचे

पत्राद्वारे विचारलेल्या प्रश्‍नांची लेखी उत्तरे द्यावीत आणि मग खुशाल स्वतःची पाठ थोपटून घ्यावी. जर खरंच वर्षभरात चांगला
कारभार केला असता तर तुमचा जाहीर सत्कार आम्हीच केला असता आणि तेवढं मोठं मन महाडिकांकडे आहे, असेही या पत्रकात म्?हटले आहे.

5 वर्षांत गोकुळ घशात घालण्याचे नियोजन

आज म्हटल्याप्रमाणे 25 वर्षे महादेवराव महाडिक यांची सत्ता होती. पण त्?यांनी स्वतःच्या हक्‍काच्या तालुक्यांमध्ये 25 वर्षात किती मतदान वाढवलं? त्या तुलनेत एका वर्षात किती नव्या डेअरीना मंजुरी दिली ? आजपर्यंत शेतकर्‍यांच्या मालकीचा राहिलेला दूध संघ 5 वर्षात घशात घालण्याचं नियोजन यामागे आहे का ? असेही या पत्रकात म्?हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT