कोल्हापूर

दै.‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशन व कॉमर्स कॉलेजतर्फे मार्गदर्शन सत्र

backup backup

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : दै.'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशन : वाणिज्य क्षेत्रामध्ये देश-विदेशात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. स्पर्धेच्या युगात जिद्द, चिकाटीच्या जोरावर करिअरचे ध्येय गाठणे शक्य आहे, असा विश्वास सी. ए. सतीश डकरे यांनी व्यक्त केला.

दै.'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशन व देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रत्नाप्पा कुंभार यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी ऑनलाईन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सी.ए. डकरे यांनी 'वाणिज्य शाखेतील रोजगार संधी' या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी रजनीताई मगदूम होत्या.

यावेळी प्राचार्य डॉ. विलास पाटील, प्राचार्य डॉ. एस. जे. फराकटे, प्राचार्य डॉ. आर. नारायणा, अ‍ॅड. वैभव पेडणेकर, व्ही. एन. पाटील, डॉ. टी. ए. हिलगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डकरे म्हणाले, सी.ए., सी.एस. सारख्या कॉमर्स क्षेत्रामध्ये करिअरच्या अतिशय चांगल्या संधी उपलब्ध आहेत. विविध उद्योजक, उद्योगांना बचत व गुंतवणूक यांचा मेळ घालण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची आवश्यकता असते.

कॉमर्स पदवीबरोबरच इतर संलग्न कोर्स करणे काळाची गरज आहे. स्पर्धेच्या युगात सामान्यज्ञान अधिक सक्षम होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज आहे. कमवा व शिका योजना प्रभावीपणे अंमलबजावणी आवश्यक आहे, असेही डकरे यांनी सांगितले.

डॉ. इब—ाहिम मुल्लाणी यांनी सूत्रसंचलन केले. डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT