कोल्हापूर

कोल्हापूर : गॅरेजला आग; दुचाकीसह साहित्य खाक

Shambhuraj Pachindre

शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम परिसरातील दुचाकी गॅरेजला शुक्रवारी रात्री शार्टसर्किटमुळे आग लागली. यात गॅरेजमधील दुचाकी, वाहन दुरुस्तीचा रॅम्प यासह टायर्स, ऑईल, स्पेअर पार्टससह दुरुस्ती व्यवसायाचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.

राजू चनाप्पा गुळेद (रा. कळंबा) यांचे फिरंगाई तालीम परिसरातील स्वाती कॉम्पलेक्समध्ये ओमसाई नावाचे गॅरेज आहे. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे गॅरेज बंद करून ते घरी गेले. रात्री साडेनऊच्या सुमारास गॅरेजला अचानक आग लागली. धूर आणि आगीचे लोट बंद दुकानातून बाहेर पडू लागले.

गॅरेजला आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील वीजपुरवठा बंद करून आग विझविण्याचे काम सुरू झाले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात आली. आग लागल्याची बातमी शिवाजीपेठत वार्‍यासारखी पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे अग्निशमन विभागाच्या कार्यात अडथळे येत होते.

पाहा व्हिडिओ : मिलिंद तेलतुंबडे नक्षलवादी कसा बनला

https://youtu.be/AKuoLpW0oO4

SCROLL FOR NEXT