कोल्हापूर

कोल्हापूर: रांगोळी यात्रेत तोडफोड करणारे तरुण सीसीटीव्हीत कैद

अविनाश सुतार

रेंदाळ : पुढारी वृत्तसेवा : रांगोळी (ता. हातकणंगले) यात्रेतील आईस्क्रीम, भेळ गाड्यांची तोडफोड करून नुकसान करणारे अज्ञात तरुण सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. तर दुसरीकडे हे प्रकरण परस्पर दडपण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. पोलीस प्रशासन निःपक्षपातीपणे तपास करून कारवाई करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भेळ, आईस्क्रीम विक्री करून तुटपुंज्या कमाईवर उदरनिर्वाह करणाऱ्या ह्या व्यावसायिकांची कोणतीही चूक नसताना तरुणांच्या हुल्लडबाजीचा फटका बसला आहे. रांगोळी यात्रेत शुक्रवारी मध्यरात्री दीड-दोनच्या सुमारास काही अज्ञात तरुणांच्या टोळीने भेळ, आईस्क्रीम गाड्यांची तोडफोड करून साहित्य अस्ताव्यस्त विस्कटून आईस्क्रीम, ज्यूस, अशा खाद्यपदार्थावर ताव मारून मोठे नुकसान केले आहे.

ही घटना उघडकीस आल्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या ह्या निष्पाप विक्रेत्यांचे केलेले नुकसान माणुसकीला काळिमा फासणारे आहे. नुकसान करणारे अज्ञात तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची चर्चा आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी पोलीस प्रशासन तपास करून कारवाई करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT