हातकणंगले येथे डोक्यात वर्मी घाव तरूणाचा खून करण्यात आला.  File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : हातकणंगले येथे डोक्यात फरशी घालून तरूणाचा खून

पुढारी वृत्तसेवा

हातकणंगले : हातकणंगले येथे तरूणाचा डोक्यात फरशी घालून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना आज (दि.२३) रात्री साडेदहाच्या सुमारास हातकणंगले- इचलकरंजी रोडजवळ घडली. विनोद महादेव बजयंत्री (कोरवी) असे या तरूणाचे नाव असून याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हातकणंगले- इचलकरंजी रोडवरती असलेल्या बारमध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास अज्ञात तिघांनी विनायकला बोलवून घेतले. व त्याच्या डोक्यात फरशीने वर्मी घाव घालून गंभीर जखमी केले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT