राशिवडे: पुंगाव ( ता. राधानगरी) येथे शेतात भांगलणीला गेल्यावर पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेलेल्या महिलेचा पाय घसरून पाण्यात पडून मृत्यू झाला. मनिषा महेश बरगे (वय ४०) असे या महिलेचे नाव आहे.
आज सकाळी मनिषा बरगे या डोंगरात भांगलणीच्या कामाला गेल्या होत्या. कामातून थोडी विश्रांती घेवून त्या पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी शेजारच्या विहिरीवर गेल्या असताना पावसाने विहिरीवर निसरड झाली होती. या निसरीडीतून त्यांच्या पाय घसरला आणि त्या पाण्यात पडल्या.
आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांना वाचवण्यासाठी कुणी आले नसल्याने बराचवेळ पाण्यात राहिल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. बऱ्याच वेळाने शोध घेतला असता त्या विहिरीत पडल्याचे दिसून आले. सदर घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यांच्या मागे दोन मुलगे आहेत.
दहा वर्षापूर्वी मनिषा त्यांचे पती महेश बरगे यांचेही अकाली ह्रदयविकाराने निधन झाले होते. दहा वर्षांतर आता मनिषा यांचेही असे निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.