भानामती केल्याचा धक्कादायक प्रकार नागाव (ता. हातकणंगले) येथील स्मशानभूमीत समोर आला आहे.  (Pudhari Photo)
कोल्हापूर

Kolhapur Black Magic | 'जे कोण आहे ते', अशी चिट्ठी लिहून लिंबू, बिब्बा, दोरा, हळद- कुंकू टाकून नागाव स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार

चिठ्ठीत तीन महिला व चार पुरूषांची नावे

पुढारी वृत्तसेवा

Nagav crematorium Bhanamati Incident

शिरोली एमआयडीसी : 'जे कोण आहे ते', अशा मजकुरात सात जणांची नावे लिहून नारळ, लिंबू, बिब्बा, दोरा व हळद कुंकू टाकून भानामती केल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.३०) नागाव (ता. हातकणंगले) येथील स्मशानभूमीत समोर आला आहे.

या अंधश्रद्धेतून केलेल्या अघोरी कृत्याच्या या प्रकाराने गावात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये तीन महिला व चार पुरूषांची नावे लिहिली असून यादव आडनावही लिहिले आहे. नागाव येथील छत्रपती शाहू नगर परिसरात असलेल्या स्मशानभूमीत गावातील एका मुलीच्या रक्षा विसर्जनाच्या वेळी हा प्रकार उघडकीस आला .

स्मशानभूमीत अज्ञात व्यक्तीने हा भानामतीचा प्रकार केला आहे. यामध्ये एक नारळ त्याला लाल दोरा गुंडाळून त्यास काळी बाहूली वळवलेला लिंबू व बिबा एकत्र बांधून त्यामध्ये लहान चिट्ठीवर " जे कोण आहे ते " असा मजकूर लिहीत प्रियंका, आश्विनी, विशाल, संगीता, आनंदा, राहुल, यादव राजू असे तीन महिला व चार पुरूषांची नावे लिहिली आहेत. अज्ञात व्यक्तीने हा भानामतीचा प्रकार स्मशानभूमीत केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंधश्रद्धेतून केलेल्या प्रकाराची गावात चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT