कोल्हापूर

कोल्हापूर: अब्दुललाट येथे पाण्यासाठी वणवण; पिके करपली

अविनाश सुतार

अब्दुललाट: पुढारी वृत्तसेवा : अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे सध्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महिलांचे पाण्यासाठी हाल होताना दिसत आहेत. तर पाण्याविना पिके करपू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सार्वजनिक कुपनलिकेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने पिण्याचे पाण्याची व्यवस्था केली आहे. परंतु हे पाणी कमी पडू लागल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

जूनचा निम्मा महिना उलटून देखील वरुण राजाची कृपा अजून झालेली नाही. धरणातील पाण्याचा साठा अत्यंत कमी झाल्याने नद्यांदेखील कोरड्या पडल्या आहेत. यामुळे सध्या एका बाजूला पिके वाळत चालल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. तर दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी गावात देखील महिलांचे हाल होताना दिसत आहे.

अब्दुललाट गावाला पंचगंगा व दुधगंगा या दोन नद्यांमधून पाणी पुरवठा होतो. परंतु या नद्यां कोरड्या पडल्यामुळे सध्या गावात नळाला गेल्या आठ दिवसांपासून पाणी आलेले नाही. त्याचबरोबर यंदा उन्हाची तीव्रता आणि जूनचा निम्मा महिना उलटून देखील पावसाचा पत्ता नाही. यामुळे भूजल पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाल्याने कूपनलिकांना पाणी अत्यंत कमी येत आहे. तर अनेक ठिकाणी विहिरींनीही तळ गाठला आहे. तर लोडशेडिंगमुळे कमी अधिक प्रमाणात वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतीला पाणीपुरवठा कमी होत आहे. यामुळे पिके धोक्यात आली आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT