गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : गारगोटी-कोल्हापूर रोडवर कलनाकवाडी पेट्रोल पंपानजीक गव्याने दर्शन दिले. गुरुवारी (दि. २३) दुपारनंतर गव्यांच्या कळपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भुदरगड तालुक्यातील जंगलांना वनवे लावल्यामुळे जंगली प्राणी मानवी वस्ती, शिवाराकडे वळले आहेत. याचा प्रत्यय तालुक्यातील विविध गावांमध्ये येत आहे. गुरुवारी (दि.२३) साडेतीन वाजताच्या सुमारास कलनाकवाडीच्या नदी शिवारातून गव्याचा कळप गारगोटी कोल्हापूर रोड ओलांडून जंगलाच्या दिशेने जाताना दिसला. यावेळी मोटरसायकल स्वार सुदैवाने बचावल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
गुरुवारी दुपारनंतर नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काहीनी तर चक्क आपल्या स्टेटसला लावून सर्वांना गव्याच्या कळपाचे दर्शन दिले. फये जंगल परिसरातीलही गव्याच्या कळपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे.
हेही वाचा;