कोल्हापूर

Dr. R. K. Kamat : सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. आर. के. कामत यांची निवड

अविनाश सुतार

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. आर. के. कामत (Dr. R. K. Kamat) यांची राज्यपाल रमेश बैस यांनी निवड केली. या याबाबतचे पत्र कुलपती कार्यालयाकडून देण्यात आले आहे. डॉ. कामत मुळचे कोल्हापूरचे असून मागील ९ महिन्यांपासून ते डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये  विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहिले आहे.

डॉ. कामत यांनी (Dr. R. K. Kamat) इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक शास्त्र  विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांनी नामांकित जर्नल्समध्ये २०० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर १६ पुस्तके लिहिली आहेत. २० विद्यार्थ्यांना पीएच.डी. साठी मार्गदर्शन केले आहे. शिवाजी विद्यापीठात भारत सरकारच्या निधीतून सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यासाठी ते ओळखले जातात. मागील पाच वर्षांत त्यांना १० कोटी रुपयांचे संशोधन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत, ज्यात युरोपियन युनियनने मंजूर केलेल्या प्रकल्पाचा समावेश आहे.

राज्य शासनाच्या उच्च शिक्षणमधील गुणवत्ता वाढविण्यासाठी रुसा या योजनेच्या अंतर्गत डॉ. होमी भाभा विद्यापीठाचे महाराष्ट्रातील पहिले समूह विद्यापीठ म्हणून २०१९ मध्ये स्थापना केली होती. व त्याचे पहिले नियमित कुलगुरू म्हणून डॉ. कामत यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये कार्यभार स्वीकारला आहे.

शिवाजी विद्यापीठ ते डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरूपद मिळणे कोल्हापूरसाठी व माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. राज्यपाल रमेश बैस यांनी माझ्यावर विश्वास टाकत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार माझ्यावर सोपवला. याचा मनस्वी आनंद आहे. कुलगुरू म्हणून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध राहीन.

– डॉ. आर. के. कामत

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT