कोल्हापूर

संकेश्वर-बांदा महामार्गावरील अपघातात दोन वानरांचा मृत्यू, दुचाकीस्वार जखमी

अविनाश सुतार

गडहिंग्लज: पुढारी वृत्तसेवा :  संकेश्वर ते बांदा राष्ट्रीय महामार्गावर सुसाट वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढतच आहे. बुधवारी (दि.८) दुपारी दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील पुलावर भरधाव वाहनांची धडक बसून दोन मोठ्या वानरांचा जागीच मृत्यू झाला. तर एक दुचाकीस्वारही जखमी झाला. रस्ता ओलांडताना मुक्या प्राण्यांचे बळी गेल्याने प्राणीप्रेमींतून हळहळ व्यक्त होत आहे.

संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रस्ता प्रशस्त झाल्यामुळे वाहनांचा वेगही प्रचंड वाढला आहे. संकेश्वर, गडहिंग्लज, आजरा, आंबोली या दरम्यानच्या गावांतून महामार्गावर येताना धोका पत्करावा लागत आहे. गेल्या दोन-तीन महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहेत. गेल्या तीन महिन्यांत तब्बल अकरा जणांचा रस्ता अपघातात बळी गेला आहे. बुधवारी दुपारी दुंडगे पुलानजीक रस्ता ओलांडणारी दोन वानरे मोटारसायकल व चारचाकी वाहनाच्या अचानक आडवी आल्याने यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकीस्वाराने पळ काढला. तर दुचाकीस्वार जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी धाव घ्यावी लागली आहे. दरम्यान वानरांच्या अपघाताची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. ही दोन्ही वानरे पूर्ण वाढ झालेली आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT